4f27309d39ebaf4b5c61eb59219f4d7b (1)

मुंबईत प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीपासून १ कोटी ९६ लाखांचा दंड वसुल

मुंबई

राज्यभरात प्लास्टिक बंदीचा निर्णय २३ जून पासून लागू करण्यात आला. तेव्हापासूनच हा निर्णय वादात आहे. प्लास्टिकचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला. तसेच प्लास्टिक वापरावर ५ हजारांपासून २५ हजारांपर्यंतच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली. २३ जून ते २ जुलै या कालावधीत मुंबई महापालिकेने १ कोटी ९६ लाख ५ हजारांची दंड वसुली केली आहे. एवढेच नाही तर १५०७ किलो प्लास्टिकही जप्त केले आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
प्लास्टिक बंदीचा निर्णय होऊन आता ९ दिवस उलटले आहेत. ९ दिवसात मुंबईतून १५०७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि १ कोटी ९६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *