rain-full

या आठवड्यात संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज – हवामान खाते

देश

महाराष्ट्रासह देशातल्या बहुतेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहे.या आठवड्यात संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून काही ठिकाणी तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, तामिळनाडू, आसाम, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये काही अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर 17 दिवसांमध्ये पावसाने संपूर्ण भारत आता व्यापला असून येता आठवडा मुसळधार पावसाचा व काही भागांमध्ये अतिवृष्टीचा असेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.
कोकण व गोवा किनारपट्टीवर मंगळवारी जोरदार पाउस पडेल असा अंदाज असून गुरुवारी मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *