534a1b8aac82551e984c97012dba8c97

मेक इन इंडिया अंतर्गत सप्तश्रुंगी गडावर फ्युनिक्यूलर ट्रॉलीचे लोकार्पण

महाराष्ट्र

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रुंगी गडावर देशातील पहिल्या फ्युनिक्यूलर ट्रॉलीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या ट्रॉलीमुळे महिला, दिव्यांग आणि वृद्ध भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुलभ होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ट्रॉलीचं काम हाती घेण्यात आलं होतं. भारतात पहिल्यांदाच अशा स्वरुपाचा रोप वे बनवण्यात आला असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. रशियन तंत्रज्ञानाची मदत घेऊन रोप वे बनवण्यात आला आहे. मेक इन इंडिया अंतर्गत प्रकल्पाचं काम करण्यात आलं. मेट्रोच्या धर्तीवर डब्याची रचना करण्यात आली आहे. एका वेळी 60 भाविक या ट्रॉलीमधून प्रवास करु शकतात.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *