Screen-Shot-2016-03-25-at-8.36.40-am

कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मुंबई

देवनारमध्ये कचऱ्याच्या गाडीने पाच वर्षाच्या मुलाला चिरडलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहम्मद गौस दस्थगीर अहमद असे या मुलाचे नाव आहे. गोवंडीतील शिवाजीनगर भागात ही घटना घडली.
शिवाजीनगरच्या प्लॉट क्रमांक 28 आणि 29 च्या मध्ये असलेल्या रस्ते क्रमांक 4 वर इथे आपल्या घरातून तो बहिणीसोबत बाहेर आला आणि अचानक समोरुन येणाऱ्या कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडला गेला. स्थानिकांनी त्याला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मुलाचा मृत्यू झाला असल्या कारणाने स्थानिकांमध्ये संताप आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या या विभागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *