sanju-7

जाणून घ्या, ‘संजू’ या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई

मनोरंजन

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर संजय दत्तचा चरित्रपट असलेल्या ‘संजू’ चित्रपटाने काही विक्रम प्रस्थापित केले आहेत. रणबीर कपूरच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३४.७५ कोटीचा गल्ला जमवला आहे. ‘संजू’ला अलिकडेच ईदला प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘रेस ३’ च्या कमाईहून अधिक कमाई करण्यात यश आले आहे.’संजू’ चित्रपटाने ‘हॉलिडे नसताना… कोणताही सण नसताना आतापर्यंत पहिल्याच दिवशी उत्तम कामगिरी  केली आहे. २०१८ सालातील आजपर्यंतचा हा स्रवाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा रणबीर कपूरचाही सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरत आहे. 3 दिवसात १०० कोटीची कमाई होईल अशा आशा वाटते. पहिल्याच दिवशी ३४.७५ कोटीची कमाई झाली असल्याचे तरण आदर्श यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *