download (4)

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मुंबईतील ब्रिटिशकालीन इमारतींना स्थान

मुंबई

मुंबईसाठी ही नक्कीच गौरवास्पद बाब ठरली आहे. मुंबईतील ब्रिटिशकालीन इमारतींना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे.‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशन पासून ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतच्या अनेक इमारती ब्रिटीशकालीन आहेत. या इमारती आजही आपला दिमाख कायम राखत डौलदारपणे उभ्या आहेत आणि मुंबईच्या सौंदर्यात भर घालत आहेत. आता याच इमारतींपैकी काही इमारतींना युनेक्सोकाच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. १९ व्या शतकातील व्हिक्टोरियन संरचना आणि २० व्या शतकातील आर्ट डेको इमारतींचा यात समावेश आहे. शनिवारी बहरिन येथे झालेल्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. हेरिटेज परवाना फोर्ट प्रेसिंक्ट आणि मरीन ड्राईव्ह प्रेसिंक्ट या दोहोंमध्ये विभागलेला आहे.
मुंबई विद्यापीठ इमारत, जुने सचिवालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, डेव्हिड ससून ग्रंथालय. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय आणि आर्ट डेकोच्या सार्वजनिक इमारतींचा समावेश आहे. बॅकबे आगारातील स्कीमची पहिली ओळ, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया राम महाल यांनी दिनशॉ वाचा रोड, इरॉस व रीगलचे सिनेमागृह आणि मरीन ड्राईव्हवरील इमारतींच्या पहिल्या ओळी यासारख्या इमारती या इमारती आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *