download (3)

धक्कादायक ! तरुणाने केलेल्या चाकू हल्ल्यात पत्नीचा मृत्यू

महाराष्ट्र

घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीसह आईच्या पोटात चाकूने भोसकून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नी मोहिणी सागर घोरपडे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सागर सदाशिव घोरपडे व आई कल्पना हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर क-हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती, क-हाड तालुक्यातील व-हाडे येथे सागर घोरपडे हे पत्नी मोहिनी, आई कल्पना यांच्यासमवेत राहतात. त्यांच्यात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वाद निर्माण झाला. त्यातून सागरने पत्नी व आईला राहत्या घराच्या पाठीमागील खोलीत नेले. तेथे त्याने दोघींनाही चाकूने भोसकले. त्यानंतर स्वत:च्या पोटात चाकू भोसकून आत्महत्येचा प्रयत्न केला.
यावेळी आरडाओरडा झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घराकडे धाव घेतली. त्यांनी जखमी तिघांनाही क-हाड येथील रुग्णालयात हलविले. मात्र मोहिनी हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर आई व सागर हे दोघेही गंभीर जखमी आहेत. याची तळबीड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *