download

काश्मीर खो-यात पूरस्थिती,अमरनाथ यात्रा स्थगित

देश

जम्मू-काश्मीरमध्ये लागोपाठ दोन दिवस सुरू असलेल्या पावसानं झेलमसह इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे काश्मीर खो-यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनानं तिस-या दिवशीही अमरनाथ यात्रा स्थगित केली आहे. तसेच काश्मीरमधील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.झेलम नदी अनंतनाग जिल्ह्यातील संगम येथे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता 21 फूट पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे दक्षिण काश्मीर आणि झेलमच्या आजूबाजूच्या परिसरात राहणा-या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या कारणामुळे अमरनाथ यात्राही थांबवली आहे.
कोणत्याही भाविकाला उत्तर काश्मीरच्या बालटाल, तर दक्षिण काश्मीरच्या पहलगामच्या पुढे जाऊ देत नाही आहेत. प्रशासनानं सर्व भाविकांना दोन शिबिरांमध्ये सुरक्षितरीत्या ठेवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *