road-accident

मुंबईत कार कंटेनरला धडकून दोघांचा मृत्यू

मुंबई

भांडुप उड्डाणपूलावर कार आणि कंटेनरची धडक होऊन या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. प्राथमिक अहवालानुसार कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील जखमींवर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळी 6:30 ते 6:45 च्या दरम्यान ही दुर्देवी घटना घडली. भांडुप उड्डाणपूलावर जाणारी कार समोरून येणाऱ्या कंटेनरला धडकली. होंडा सिटी गाडी ठाण्याच्या दिशेने जात असताना वाहनचालकांचे गाडीवरची पकड सुटल्यामुळे गाडी दुसऱ्या बाजूला जाऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडकली. MH04 HU 0072 असा अपघातग्रस्त गाडीचा क्रमांक आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *