download (2)

पॅन कार्डसोबत आजच लिंक करा आधार कार्ड

देश

आज आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची शेवटची तारीख असून बँक ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आज संपणार आहे. ही मुदत आतापर्यंत चार वेळा वाढ करुन देण्यात आली होती. आधार कार्डला पॅन क्रमांक जोडणे सरकारने बंधनकारक केले असल्यामुळे तुम्ही अजूनही जर आधार कार्ड पॅनसोबत लिंक केले नसेल तर इतर कामे बाजूला ठेवून पाहिले हे काम तातडीने करा.
ही नवीन सुविधा आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेले नाव टाकावे लागेल. वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर लगेच तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक होईल. दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *