niranjan-davkhare-1

कोकण पदवीधर: निरंजन डावखरे विजयी !

कोकण

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे निरंजन डावखरे यांनी बाजी मारली. डावखरे यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय मोरे यांचा २९८८ मतांनी पराभव केला. मतमोजणीच्या सुरूवातीला संजय मोरे हे २००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. मात्र, तिन्ही उमेदवारांमध्ये मतांचे अंतर खूप कमी होते. पहिल्या फेरीत डावखरे हे आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीत डाखरेंना १०,३०४ मोरेंना ९,४९४ मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीनंतर डावखरे यांना ११,१८० आणि मोरे यांना ८,९९७ मते मिळाली होती.तिसऱ्या फेरीत डावखरेंनी निर्णायक आघाडी घेतली. या फेरीत त्यांना २८,९४५ तर मोरेंना २३,२११ मते मिळाली. या फेरीत डावखरे हे ५,७३४ मतांनी आघाडीवर होते. मात्र कोटा पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असलेली मते न मिळाल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत सुमारे अडीच हजाराहून अधिक मते अवैध ठरली. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ७३.८९ टक्के इतके मतदान झाले होते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *