download

​​​​​​​प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

महाराष्ट्र

डहाणू तालुक्यातील वाणगाव पूर्वेकडील जंगल भागात मोठ्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरूण -तरूणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हनुमान नगर येथील जितेश डावरे हा मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या मित्राची बाईक घेवून घरातून निघाला होता. जितेश हा विवाहित असून बोईसर गणेशनगर येथील आम्रपाली गवई या विवाहित मुलीसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मात्र, गुरुवारी सकाळी गावकऱ्यांना दोघांचे मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळले.
मंगळवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या दोघांना त्यांचे घरचे शोधत होते. मात्र, आज वाणगाव पुर्वेकडील जंगल परिसरात मोठ्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत जितेश आणि आम्रपालीचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी जितेश याने मित्राची आणलेली बाईक दुरवर एक स्टँडवर उभी केली होती. त्या बाईकवर मयत मुलीची चप्पल देखील आढळून आली. वाणगाव पोलीस ठाण्यात याबाबत आत्महत्येचा गुन्हा दाखल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *