images

देशात मराठी भाषेची तिसऱ्या स्थानावर झेप

महाराष्ट्र

भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. देशात झालेल्या जनगणेच्या सर्वेक्षणात मराठी ही हिंदी आणि बंगाली नंतर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा असल्याची माहीती पुढे आली आहे.
देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलुगू भाषेला मागे टाकले आहे. हिंदी भाषा पहिल्या स्थानी असून हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१. ०३ टक्क्यांवरुन ४३. ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर बंगाली भाषा ही दुसऱ्या स्थानी आहे. २०११ मधील जनगणनेच्या आधारे देशातील कोणती भाषा किती बोलली जाते याची यादी तयार करण्यात आलेय. मराठी भाषा ही जगात १८ क्रमांकावर आहे. तर भारतातील आता तिसऱ्या क्रमांची भाषा आहे. महाराष्ट्र राज्यातील अधिकृत भाषा मराठी आहे. मराठी ही राज्यभाषा आहे.मराठी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण २००१ मध्ये मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ६.९९ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ७.०९ टक्क्यांवर पोहोचले. तेलुगू मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण घटले आहे. तेलुगू भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण ७. १९ टक्क्यांवरुन ६. ९३ टक्क्यांवर घसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *