John-Abraham-Satyamev-Jayat

जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर रिलीज

मनोरंजन

नुकताच जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात बॉलिवूडचा अ‍ॅक्शन मॅन जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. ‘सत्यमेव जयते’च्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. हा ट्रेलर अखेर आज रिलीज करण्यात आला आहे.
या चित्रपटात जॉनने भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली असून तो आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी एकटाच मैदानात उतरला आहे. जॉन या लढाईत अनेकांना संपवतो. खाकीच्या रक्षणासाठी खाकीच्याच विरोधात उभा राहतो. ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी हा सुद्धा दिसतो.
मनोज वाजपेयी चित्रपटात सीरिअल किलरच्या शोधात असलेला पोलिस अधिकारी साकारतो आहे. भरपूर अ‍ॅक्शन आणि ड्रामा याने रंगलेला ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट स्वातंत्र्य दिनी रिलीज होणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *