623301456

डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठली नीचांकी पातळी, सामान्यांना मोठा फटका

व्यापार

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली. आज (२८ जून २०१८) सकाळी रुपया २८ पैशांच्या घसरणीसह डॉलरच्या तुलनेत ६८.८९ रुपयांवर घडला. त्यानंतर रुपयाचा दर आणखीन घसरून ६९.०९ या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीला पोहचला. त्यानंतर रुपयामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली असून आता रुपया ६८.८२ वर स्थिर आहे. मात्र भविष्यात रुपयाच्या दरात घसरण होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
महागाई वाढण्याची शक्यता
रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत मजबूत झाल्याने कच्च्या तेलांच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होणार. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलांच्या किंमतीत घट झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट होत होती. मात्र रुपया पडल्यास या किंमती पुन्हा उसळी खाऊ शकतात. तसेच परदेशातून देशात आयात होणाऱ्या तेलासाठी जास्त किंमत मोजावी लागेल. आणि या अधिकच्या किंमतीचा थेट भार सामान्यांच्या खिश्यावर पडेल. सरळ सांगायचे झाले तर कच्च्या तेलांच्या किंमत वाढली तर महागाई वाढेल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *