294890-plane-crash

महिला पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

मुंबई

महिला पायलटच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटनेनंतर मोठा अनर्थ टळला. विमानात बिघाड असल्याचं लक्षात आल्यानंतर मारिया यांनी घाटकोपरमधील मोकळ्या जागेत विमानाचं क्रॅश लँडिंग केलं.
विमानाच्या महिला पायलट मरिया यांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. विमानाच्या पायलट मारिया यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर परिस्थिती आणखी भयानक झाली असती. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे.
घाटकोपर पश्चिममध्ये जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळील परिसरात एका इमारतीच्या बांधकामाच्या मोकळ्या जागेत पायलटकडून हे विमान क्रॅश लॅडिंग करण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. विमानात बिघाड निर्माण झाल्याने ते तातडीने कमी वर्दळीच्या जागी उतरवणे गरजेचे असल्याने पायलटकडून तसा प्रयत्न करण्यात आला.
घाटकोपरचा संपूर्ण भाग हा खूपच दाट लोकवस्तीचा असल्याने विमान क्रॅश झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकली असती. मात्र, कन्स्ट्रक्शन साईटजवळील जागा मोकळी असल्याने पायलटने विचारपूर्वक निर्णय घेतल्याने ही जीवितहानी होऊ शकली नाही.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *