amarnath-yatra-by-helicopter-via-pahalgam-india

मुसळधार पावसामुळे रोखली अमरनाथ यात्रा

देश

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रेकरुंना बालटाल येथे थांबवण्यात आले आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर पाऊस कोसळत असल्यामुळे काही वेळासाठी यात्रा स्थगित करण्यात आली आहे.अमरनाथ यात्रेला काल म्हणजेच बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या जथ्थ्यामध्ये 330 महिला आणि 30 लहान मुलांसह 1904 भाविकांचा समावेश आहे. यात्रेकरुंचा पहिला जथ्था अमरनाथच्या दिशेने रवाना झाला. मात्र जोरदार पावसामुळे यात्रा सध्या स्थगित करण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रा पुढील 60 दिवस चालणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी दोन लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. त्यातच सुट्ट्यांमुळे श्रीनगरमधील पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. श्रीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.
25 हजार सीआरपीएफ जवान, 15 हजार जम्मू आणि काश्मिर पोलिस भाविकांच्या बंदोबस्तासाठी तैनात आहेत. यंदा पहिल्यांदाच मोटारसायकल स्क्वॉडद्वारे सुरक्षा देण्यात आली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *