st-accident

अलिबाग कार्लेखिंड येथे एसटी बसला भीषण अपघात

कोकण

अलिबागमधील कार्लेखिंड येथे ‘शिवशाही’ बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेत १५ प्रवासी जखमी झाले असून एसटी बसचालकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राज्य परिवहन महामंडळाची ‘शिवशाही’ बस मुरुडवरुन स्वारगेटला जात होती. तर एसटी बस पनवेलवरुन अलिबागला येत होती. कार्लेखिंड येथे ओव्हरटेक करताना शिवशाही बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला धडक दिली. या अपघातात १५ जण जखमी झाले असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *