thu1528724152

अक्षय कुमारचा मराठी चित्रपट ‘चुंबक’चं टीझर रिलीज

मनोरंजन

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार प्रस्तुत पहिला मराठी चित्रपट चुंबकचा टीझर आणि पोस्टर आज रिलीज झाला आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटातील तीन प्रमुख व्यक्तिरेखा प्रभावीपणे रेखाटल्या गेल्या आहेत. चित्रपटाचे हे नायक मुंबईत भारतीय रिझर्व बँकेच्या कार्यालयाच्या बाहेर एका विचित्र परिस्थितीत कसे अडकतात त्याचे अधोरेखन या पोस्टरमध्ये आहे. ‘दुष्कृत्यांचा शहेनशाह’ असे ज्याला संबोधले जाते तो मोबाइल मॅकेनिक ‘डिस्को’, हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा पण ज्याला ‘गव्हर्नरचा असिस्टंट’ संबोधले जाते असा ‘बाळू’, गबाळा दिसणारा आणि दुष्कृत्यांना नाहक बळी पडणारा स्वानंद किरकिरे यांनी साकारलेला ‘प्रसन्ना’ हे या पोस्टरवर आहेत. पोस्टर मनाला भिडणारे आणि तेवढेच प्रभावी झाले आहे.स्वानंद किरकिरेंचा प्रसन्ना, साहिल जाधवचा बाळू यांच्यातील बसमधून प्रवास करत असताना खिडकीजवळील जागा पटकावण्यासाठी झालेली ‘चकमक’ या टीझरमध्ये प्रभावीपणे दिसते. बॉलिवूडमधील आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारने सामाजिक माध्यमांचा आधार घेत शुद्ध मराठीत एक घोषणा केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्या सिनेमाची उत्सूकता आहे. अक्षयने एक व्हिडिओ शेअर करुन चुंबक या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाची प्रस्तुती तो स्वतः करत असल्याची घोषणा केली होती. चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटीया आणि नरेन कुमार करत असून कायरा कुमार क्रीएशन्स प्रोडक्शनचा चित्रपट आहे.
सिनेमातील पहिली महत्वाची व्यक्तिरेखा आहे, प्रसन्ना ठोंबरेची. दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या आणि आघाडीचे गीतकार, संगीत दिग्दर्शक, गायक आणि लेखक असलेल्या स्वानंद किरकिरे यांनी ही भूमिका साकारली आहे. सोलापूरमधील एका छोट्या गावातील गतिमंद आणि सरळसाध्या अशा व्यक्तीची ही भूमिका आहे. स्वानंद अगदी पहिल्यांदाच चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारात आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *