1515037396_3

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात

महाराष्ट्र

पुणे-बंगळुरु महामार्गावर होनगा येथे कंटेनर आणि मारुती व्हॅनमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. सीट बेल्ट काढताना मारुती व्हॅन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.ताबा सुटल्यानंतर गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. जावेद हुसेन मुश्रीफ (वय 55 वर्ष) यांचा या अपघातात मृत्यू झाला. गाडी वेगात असल्याने धडक जोरदार झाली. यामध्ये गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. जखमींवर बेळगावातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *