vrushant patil

लोणारेच्या वृषांत पाटीलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

कोकण महाराष्ट्र शिक्षण

अलिबाग तालुक्यातील लोणारे येथील रहिवाशी श्री. विश्वजित पाटील यांचा चिरंजीव कु. वृषांत पाटील याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. अलिबाग येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत वृषांत दहावीचे शिक्षण घेत होता. इयत्ता पहिली पासून अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या वृषांतला आपण दहावीच्या परीक्षेतही नव्वदीचा आकडा पार करू असा दृढ आत्मविश्वास होता.

स्वभावाने अतिशय शांत आणि संयमी असलेल्या वृषांतला आपले आजोबा कै. रामदास पाटील यांच्याप्रमाणे संगीताची फार आवड आणि रुची आहे. वृषांत हा फक्त अभ्यासातच हुशार नसून एक उत्कृष्ट तबला वादक, अभिनयात पारंगत, दर्जेदार वक्तृत्व आणि क्रिकेट व कब्बडी सारख्या मैदानी खेळांची आवड असलेला एक सर्व गुण संपन्न असे व्यक्तिमत्व आत्मसात केलेला मुलगा असून, तो येणाऱ्या भविष्यकाळात लोणारे सारख्या एका लहान गावाचे नाव साता समुद्रापार नक्कीच रोशन करेल, यात मात्र शंका नाही.

वृषांतला त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा !

nakeen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *