wadala

वडाळ्यात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून गाड्यांचे नुकसान

मुंबई

मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असतानाच वडाळ्यातील अँटॉप हिल परिसरात दोस्ती पार्क इमारतीजवळील रस्ता खचल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. रस्ता खचल्याने इमारतीची संरक्षक भिंत देखील कोसळली असून या घटनेत सुमारे सात गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी रस्त्याच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

वडाळ्यातील विद्यालंकार रोडवरील लॉर्ड्स इस्टेट परिसरात दोस्ती पार्क इमारत आहे. या इमारतीजवळील रस्ता सोमवारी खचला. यामुळे रस्त्यावर मोठा खड्डाच पडला असून यात सात गाड्यांचे नुकसान झाले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *