imageedit_22_9731464773

मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाची जोरदार हजेरी

मुंबई

मुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं असून तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकही विस्कळीत झाली आहे.चेंबुर, सायन, कुर्ला, हिंदमाता परिसरात नेहमी प्रमाणे पाणी साचलं आहे. चेंबुरमध्ये काही घरांमध्येही पाणी शिरलं.तसेच दक्षिण मुंबईसह विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड या उपनगरात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरातही पाणी साठल्याने नागरिकांची चांगलीच अडचण झाली आहे.
मुंबई आणि उपनगरासह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. पाणी साचण्याच्या घटनांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *