nitesh rane

नितेश राणे – प्रचंड कार्यक्षमता असलेले तरुण नेतृत्व

अग्रलेख महाराष्ट्र

कोकणचे सुपुत्र, महाराष्ट्राचे तरुण नेते, कणकवली मतदार संघाचे आमदार मान.नितेश नारायणराव राणे यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार श्री.नारायणराव राणे यांच्या प्रमाणेच माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे आक्रमक स्वभावाचे, निडर, सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याया विरोधात सदैव आवाज उठवणारे आणि तेवढेच अभ्यासू शैलींचे, उच्च विचारांचे तरुण नेते फक्त कोकणालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेले आहेत.
नितेश राणे यांनी आमदार झाल्यापासून अवघ्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत धोरणात्मक आणि विकासात्मक कामांना प्राधान्य देऊन ती कामे पूर्णत्वास आणली. आपल्या मतदार संघातील स्थानिक जनतेची गरज त्यांनी ओळखली आणि त्यांना लागणाऱ्या सुविधा पुरविण्याकडे विशेष लक्ष दिले.नितेश राणे यांनी अल्पावधीत केलेल्या विशेष कामगिरीमुळे आज फक्त सिंधुदुर्गातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कामांची चर्चा होत आहे.

इतर नेत्यांप्रमाणे फक्त भाषण करणे, जनतेला आश्वासन देणे असे न करता कमी कालावधीत त्यांनी कृतीवर जास्त भर दिला आहे. आपल्या जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात वेळेप्रसंगी त्यांना तुरुंगवास हि भोगावा लागला आहे. आमदार नितेश राणे यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला तर शब्द अपुरे पडतील. परंतु, प्रत्येक काम आणि त्या कामाचा दर्जा हा ‘राणे’ या नावाला साजेसा असाच. शाळांचे डिजिटलायझेशन असेल, स्कुबा डायव्हिंग सेंटर ,म्युझियम आणि विशेष म्हणजे भारतातील पहिले कंटेनर थिएटर असेल. यातून कोकणामध्ये पर्यटन व्यवसाय कसा वाढविता येईल आणि त्यातून इथल्या स्थानिक जनतेला रोजगार कसा मिळेल. हा प्रमुख उद्देश यातून दिसून येतो. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांतून त्यांचा दूरदृष्टीपणा दिसून येतो.

असा तरुण नेता कोकणाला, महाराष्ट्रातील तरुणांना लाभणे हि खरच उत्तम बाब आहे. नितेश राणे यांच्यामध्ये असलेला प्रचंड आत्मविश्वास, त्यांची निर्भीड आणि आक्रमक वृत्ती, असलेला दूरदृष्टीकोन, त्यांचे वक्तृत्व, एखादी गोष्टी हाती घेतल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी मनात असलेली जिद्द,आपल्या कार्यकर्त्यांवर असलेला विश्वास आणि प्रचंड कार्यक्षमता याविशेष गुणांमुळे भविष्यात महाराष्ट्राला नितेश राणे यांच्या गुणांचा फायदा होईल हे नक्की.

नितीन पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *