f8df5bb97aac520b44c7a674ebf42d8d (1)

नाशिकमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र

नाशिकमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा हायवेवर शिरवाडे फाट्याजवळील ही दुर्घटना आहे.चांदवड तालुक्यातील खडकजांब गावाच्या शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात असताना जीपचे टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात जीप दुभाजक ओलंडून नाशिककडून वडाळीभोईकडे येणार्‍या सटाणा आगाराच्या बस (एम एच १४, बीटी ४७१६) ला जोरदार धडक दिली.या धडकेत जीपमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 5 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जीपमधील सर्वजण सटाणा तालुक्यातील किकवारी खुर्द येथे एका लग्नासाठी चालले होते. यावेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला. जखमींवर पिंपळगाव बसवत येथे उपचार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *