images

‘राज्यात आजपासून ‘प्लास्टिकबंदी’

महाराष्ट्र

राज्यात आजपासून प्लास्टिक बंद होणार आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही प्लास्टिक वापरल्यास पाच हजार रुपयांचा दंड बसणार आहे. मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांकडून या निर्णयावर टीकाही होत आहे.
उच्च न्यायालयानेही प्लास्टिकबंदीबाबत व्यापाऱ्यांना कुठलाही दिलासा दिला नाही. राज्य सरकारच्या अध्यादेशाबाबत दाद मागण्यासाठी तीन आठवड्याचा अवधीही उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच, 20 जुलैला अंतिम सुनावणीची तारिख ठरवली जाईल, असेही उच्च न्यायालयाने सांगितले.

या प्लास्टिकवर होणार बंदी –

– चहा कप
– सरबत ग्लास
– थर्माकोल प्लेट
– सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल
– हॉटेलमध्ये पार्सल देण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक (प्लस्टिक डब्बे, चमचे, पिशवी)
– उत्पादन ठेवण्यासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक

या प्लास्टिकवर कारवाई होणार नाही –

– उत्पादनासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक आणि थर्माकोल
– हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टिक उपकरणे, सलाईन बॉटल्स, औषधांचे आवरणं
– प्लस्टिक पेन
– दुधाच्या पिशव्या (50 मायक्रॉनच्या वर)
– रेनकोट
– अन्नधान्य साठवण करण्यासाठी वापरण्यात येणार प्लस्टिक
– नर्सरीमध्ये वापरण्यात येणारं प्लास्टिक
– टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर यांसारख्या उत्पादनांना पॅकिंग करताना वापरण्यात येणार थर्माकोल आणि प्लास्टिक
– बिस्कीट, चिप्स अशा पदार्थांची प्लास्टिक आवरणं

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *