nilesh rane 2

मराठा समाजासाठी यापुढे कायम लढत राहणार. – निलेश राणे

महाराष्ट्र

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपींवर भर कोर्टात हल्ला प्रकरणी गेली दिड वर्षे तुरुंगात असलेले शिवबा संघटनेचे राजू जऱ्हाड, अमोल खुणे, बाबू वाळेकर आणि गणेश खुणे या तरुणांना अटक करण्यात आली होती.मागील दिड वर्षांपासून हे तरुण तुरुंगात शिक्षा भोगत होते. या चार मराठा मावळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत,असा निर्धार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला होता.

या तरुणांना जामीन मिळावा यासाठी चांगल्या वकिलाची गरज होती. निलेश राणे यांनी जेष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांना विनंती केली. या न्यायालयीन लढाईसाठी जो काही खर्च येईल, तो करण्याचीही तयारी माजी खासदार निलेश राणे यांनी केली होती. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद न्यायालयाने या चारही जणांचा जामीन मंजूर केला.

या प्रकरणी निलेश राणे यांनी शिवबा संघटनेच्या माझ्या चार तरुणांना न्याय मिळाला याचे समाधान व्यक्त केले आहे. काही महिन्यांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी त्या तरुणांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती आणि त्यांना तसे आश्वासन दिले होते. आपण दिलेला शब्द पूर्ण केला आणि यापुढेही मराठा समाजासाठी कायम लढत राहणार. असे वचन निलेश राणे यांनी दिले.

 

Namkeen

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *