download

येत्या २४ तासात मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई

येत्या २४ तासात मुंबईत मुसळधार पाऊस पडेल असा आणखी एक नवा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. स्कायमेटनेही कोकण, गोव्यात वादळीवाऱयासह पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र आणखी गडद झाल्यास मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाचे वरीष्ठ वैज्ञानिक के.श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.
गेल्या २४ तासांत गोवा, पणजी येथे १५५ मिमी, सावंतवाडी १६५ मिमी, वेंगुर्ला ३१९ मिमी, कुडाळ १६७ मिमी, मालवण ३४५ मिमी, कणकवली ८८ मिमी, देवगड १८६ मिमी, दापोली ३६२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *