_7f26c870-102c-11e8-82d6-43c3cccec057

दोन बसच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू

मुंबई

कुर्ला पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सकाळी दोन बेस्ट बसेसचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एक महिलेला आपल्या प्राणांना मुकावे लागले. बेस्ट बस मागे घेत असताना दुसऱ्या बसला धडकली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर महिलेला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर महिलेला मृत घोषित केले.
खरंतर कंडक्टरच्या मदतीशिवाय चालकाने बस मागे घेऊ नये. कारण असे केल्यास अपघात घडण्याची शक्यता असते. यापूर्वी सुद्धा चालकाने कंडक्टरच्या मदतीशिवाय बस मागे घेतल्यामुळे काही अपघात झाले आहेत.
दोन बसमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी याबाबत बेस्ट चालकाला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *