download

कुऱ्हाडीचे घाव घालून केली आई वडिलांची हत्या

देश

२४ वर्षांच्या एका मुलाने आपल्या आई वडिलांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेओराम (वय ५५) आणि सोना देवी (वय ४२) अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचा २४ वर्षांचा मुलगा ड्रग अॅडिक्ट असल्याचीही माहिती समोर येते आहे. कुरुक्षेत्र येथील शाहबाद तालुक्यात असलेल्या चारूनी गावात ही घटना घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी आई वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या मुलाला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरु आहे, अंमली पदार्थ घेण्यासाठी पैसे मिळत नसल्यानेच या मुलाने आई वडिलांना ठार केले असावे असे पोलिसांनी म्हटले आहे.
गुरुवारी रात्री ही घटना घडली तेव्हा हा मुलगा दारूच्या नशेत होता, प्राथमिक तपासाअंती हीच माहिती समोर येते आहे की अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असलेल्या या मुलाने आई वडिलांशी वाद होत असल्यानेच त्यांची हत्या केली. हिंदु्स्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे. २४ वर्षांच्या या मुलाचे नाव विशाल असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी विशालच्या आई वडिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *