Passport

आधी धर्म बदला’ सांगणाऱ्या अधिकाऱ्याची बदली

देश

उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका मुस्लिम तरुणाला पासपोर्टच्या नुतनीकरणासाठी धर्म बदलण्याचा अजब सल्ला देणाऱ्या अधिकाऱ्याची तातडीनं बदली करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत एका महिलेने पासपोर्ट कार्यालयात धर्माच्या नावाखाली अपमान केल्याचा आरोप केला होता. एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं असल्याने आपला अपमान करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला होता, त्यांनी यासंबंधी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि प्रधानमंत्री कार्यालयाला ट्विट करत तक्रारही केली होती.
आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या एका दाम्पत्याला पासपोर्ट काढण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलंय. हिंदू पत्नी आणि मुस्लिम पती असलेल्या या दाम्पत्यालाचा पोसपोर्टसाठीचा अर्ज पासपोर्ट अधिकाऱ्यानं फेटाळून लावला. इतकंच नाही तर पतीला हिंदू धर्म स्वीकारण्याचा आणि सात फेरे घेऊन विवाह करण्याचा अवांछिक सल्लाही अधिकाऱ्यानं या दाम्पत्याला दिला. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ही घटना उघडकीस आलीय. या दाम्पत्यानं केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि पीएमओला ट्विट करत या घटनेची माहिती देत यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
बुधवारी पासपोर्ट कार्यालयात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेले असताना मोहम्मद अनस सिद्दीकी आणि त्यांची पत्नी तन्वी सेठ यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी विकास मिश्रा याने अनस सिद्दीकी यांना धर्मांतर करण्यास सांगितलं. इतकंच नाही तर तन्वी यांना सर्व कागदपत्रांवर आपलं नाव बदलण्यासही सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *