031079576e5a152d8d1d18b06a4f5d9d

आलिबागच्या रिक्षाचालकाने वाचवले चौघांचे प्राण

कोकण

चौल येथील बहाद्दर मिनीडोर रिक्षा चालक प्रदीप विश्वनाथ शिंदे यांनी उधाणाची भरती चालू असताना अलिबाग-नागाव मार्गावरील बेलीफाटा येथील पुलावरून खाडीत कोसळलेल्या कार मधील चौघांना आपल्या जीवाची पर्वा न करता मोठय़ा धाडसाने खाडीत उडी मारुन बाहेर काढले.
अलिबाग जवळील पिंपळभाट येथे राहणारे दिवेकर आणि घरत कुटुंबिय सोमवार दि. 18 जून रोजी नांदगांव(मुरु ड) येथून आपल्या एका नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून ङोन एस्टलो या कारने अलिबागकडे येत होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अलिबाग-नागाव मार्गावरील बेली फाटा येथील छोटय़ा पुला जवळ कारचे मागील चाक रस्त्याचा खाली उतरल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्नण सुटून गाडी सुरक्षा कठडे नसलेल्या या पुलाच्या उजव्या बाजूकडून खोल खाडीत पडली. भरतीची वेळी असल्याने उधाणाचे पाणी वेगाने वहात होते. याच दरम्यान या कार मागून येणा:या मिनीडोअर रिक्षाचालक प्रदीप विश्वनाथ शिंदे यांनी कार पुलावरून खाली पडल्याचे पाहिले. दादा आम्हाला वाचवा, दादा आम्हाला वाचवा, म्हणून कारमधील महिला मदतीकरीता ओरडत होते. शिंदे यांनी क्षणाचाही विचार न करता आपली मिनीडोअर रिक्षा थांबवून कारमधील प्रवाशांना वाचविण्यासाठी खाडीच्या पाण्यात उडी घेतली.
कार पाण्यात पडली मात्न सुदैवाने पाण्यावर तरंगत असल्याने कारमधील प्रवासी जिवाच्या आकांताने आरडाओरड करु लागले. कारचे चालक स्वप्निल दिवेकर (39) यांना थोडेफार पोहोता येत होते. तर कारमधील अन्य चंद्रकांत जनार्दन घरत (55), संपदा जनार्दन घरत (43), सोनाली राजेश दिवेकर (34) यांना पोहोता येत नव्हते. चालक स्वप्निल दिवेकर कसाबसा कारच्या बाहेर आला. तेव्हा त्यांना कोणीतरी आपल्याला वाचिवण्यासाठी येत असल्याचे पाहून मोठा धीर आला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *