crime

पाणी सोडलं नाही म्हणून केला वॉचमनचा खून

मुंबई

उल्हासनगरातील सोसायटीच्या सचिवाने सुरक्षा रक्षकाचा गळा दाबून खून केला. विकास सोनार असं सुरक्षा रक्षकाचं नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विकी तलरेजा याला अटक केली आहे.
विकास हा सांगितलेली कामं करत नव्हता यावरून विकी तलरेजा आधीपासूनच त्याच्यावर भडकलेला होता. पाणी न सोडल्याने सोसायटीतील सदस्यांच्या घरी पाणी आलं नाही, ज्यामुळे अनेकांनी तलरेजाच्या नावाने शंख करायला सुरूवात केली होती. यामुळे भडकलेल्या तलरेजाने विकासला गाठलं आणि त्याला जाब विचारला. दोघांमध्ये झालेल्या बाचाबाची दरम्यान विकी तलरेजाने विकासचा गळा आवळला. गळा आवळल्याने विकास बेशुद्ध पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *