9bmHepziGarbageG7Q2QKG723jpgjpg

मुंबईकरांची दुर्गंधीपासून सुटका,कचरा होणार आता अंडरग्राऊंड

मुंबई

रस्त्यांवर ठिकठिकाणी ओसंडून वाहणारे कचऱ्याचे डबे, डब्याभोवतीच्या जागेतही असलेले घाणीचे साम्राज्य आणि येथून नाक धरून चालणारे मुंबईकर… हे चित्र आता बदललं जाणार असून त्यासाठी मुंबई महापालिका जमीन खालील कचऱ्याचे डबे बसवणार आहे. हे मोठे कचऱ्याचे डबे जमिनीच्या आत बसवले जाणार असून, जमिनीच्या वरच्या भागात केवळ त्यात कचरा टाकण्यासाठीची चौकोनी जागा असणारा आहे. जमिनीवरील भागात कचरा पडणार नसल्यानं परिसरात घाणीचं साम्राज्यही दिसणार नाही. खालचा भरलेला कचऱ्याचा डबा वरती घेण्यासाठी हायड्रोलिक जॅकचा वापर केला जाणार आहे. नेहमीची दुर्गंधी आणि अस्वच्छता याला वैतागलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या या नव्या धोरणाचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *