1b3c5b5be818883780de68ff246f35c6

धक्कादायक! कल्याण स्टेशनवर पोलिसाने केला महिलेचा विनयभंग

महाराष्ट्र

कल्याण रेल्वे स्टेशनवर एका पोलिसानेच महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरुन या घृणास्पद प्रकाराला वाचा फुटली आहे. कल्याण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ४ वर प्रवाशांना बसता यावे यासाठी काही बाकडे बसवण्यात आले आहेत. या बाकडयांवर प्रवाशांसोबत एक पोलीसही बसला होता.
काही वेळाने या पोलिसाने शेजारी महिलेच्या पाठिवर हात फिरवण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्टेशनवर असलेल्या काहीजणांनी हा किळसवाणा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात शूट केला. दोन महिला आणि एक लहान मुल बेंचवर बसले होते. त्यावेळी पोलिसाने शेजारी बसलेल्या महिलेच्या पाठिवर हात फिरवण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या बेंचवर बसलेल्या इतर प्रवाशांतच्या हा प्रकार लक्षात आला पण कोणी काही बोलले नाही.
त्याचवेळी स्टेशनवर उभ्या असलेल्या इतरमुलांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर एका माणसाने या पोलिसाला मारहाण केली. पण आपली चूक मान्य करण्याऐवजी तो पोलिसवाला हुज्जत घालून बघून घेण्याची भाषा करत होता. स्टेशनवरील प्रवाशांनी नंतर रेल्वे पोलिसांना बोलवून त्यांच्या ताब्यात आरोपीला देण्याची मागणी केली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *