22f08176950ce8fc7035289148e25921

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली मंजुरी

देश

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. राज्यपाल राजवटीबाबत शिफारस करणारा अहवाल जम्मू काश्मीरचे राज्यपाल एनएन व्होरा यांनी राष्ट्रपतींना दिला होता. या शिफारशीला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राज्यपाल राजवट असेल. जम्मू काश्मीरला कलम ३७० अंतर्गत विशेष दर्जा असल्याने तिथे इतर राज्यांसह राष्ट्रपती राजवट लागू होत नाही. दरम्यान सहा महिन्यात परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर विधानसभा भंग करुन पुन्हा निवडणुका घेण्याचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात.
मोदींच्या काळात प्रथमच भाजप सत्तेतून बाहेर पडले आहे. भाजप नेते राम माधव यांनी युती तोडल्याची घोषणा केली असून जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली होती. भाजपानं पीडीपीची साथ सोडल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार काल कोसळलं. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनंदेखील सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

जम्मू-काश्मीर विधानसभेतील संख्याबळ

पीडीपी – २८
भाजपा – २५
काँग्रेस – १२
नॅशनल कॉन्फरन्स – १५

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *