59d2d6cbadf8a7ff099caeb5a9bd5f98

अनुकृती वास ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018’ ची मानकरी

मनोरंजन

तामिळनाडूची अनुकृती वास ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018’ ची मानकरी ठरली आहे. हरियाणाची मीनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती, तर आंध्र प्रदेशची श्रेया राव द्वितीय उपविजेती झाली. मुंबईतील एनएससीआय स्टेडियममध्ये 55 वी ‘मिस इंडिया’ स्पर्धा पार पडला.
गतविजेती मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लरने अनुकृती वास हिला ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018’चा मुकूट घातला. मिस युनायटेड काँटिनेंट्स 2017 सना दुआने प्रथम उपविजेत्या मीनाक्षीला, तर मिस इंटरकाँटिनेंटल प्रियंका कुमारीने द्वितीय उपविजेत्या श्रेयाच्या डोक्यावर ताज ठेवला.
19 वर्षीय अनुकृती लोयोला महाविद्यालयातून फ्रेंच या विषयात पदवी शिक्षण घेत आहे. तिला मॉडेलिंग आणि अभिनयामध्ये रस आहे. अनुकृती आंतरराष्ट्रीय ब्यूटी पेजंट्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *