raigad

रायगड खालापूर तालुक्यात पुजेतील जेवणातून विषबाधा

कोकण

रायगडातील महडमध्ये पूजेच्या जेवणातून ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये तीन चिमुरड्यांसह चौघांना जीव गमवावा लागला.
खालापूर तालुक्यातील महड येथील माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पुजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटपून स्वगृही परतलेल्यांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला. ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त असून सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, तोपर्यंत ३ लहान मुलांचा मृत्यू झाला. तर २५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पनवेलमधील रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *