sanjay-gharat-1

केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत निलंबित

मुंबई

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यास निलंबित करण्यात आले आहे. पालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी हा कारवाई केली आहे. घरतला ३५ लाख रुपयांची लाच घेताना गेल्या आठवड्यात पकडण्यात आले होते आणि त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली होती. घरत याच्यासह लाच घेताना पकडलेल्या आणखी दोन जणांचं निलंबन करण्यात आलं आहे.
संजय घरत यांना ८ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली होती. २७ गावातल्या एका अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी घरत यांनी ४२ लाखांची मागणी केली होती. या रक्कमेवर तडजोड होऊन ३५ लाख रूपये देण्याचं ठरलं होतं. मात्र तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचेतला पहिला ८ लाखांचा हफ्ता स्वीकारताना घरत अलगद जाळ्या सापडले. घरत यांच्या कार्यालयातल्या दोन लिपीकांचीही या प्रकरणी चौकशी सुरू आहे. घरत यांच्या याआधीही अनेक प्रकरणात चौकशी सुरू आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *