iit-bombay

IIT बॉम्बेमध्ये सीनिअर विद्यार्थ्याकडून लैंगिक छळ,फेसबुकवरुन फोडली वाचा

मुंबई

आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या एका सीनिअर विद्यार्थ्यावर लैंगिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. फेसबुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे. फेसबुकवर आयआयटी बॉम्बेच्या कन्फेशन पेजवर विद्यार्थ्यांनी आपल्याला सामोरं जावं लागलेल्या परिस्थितीसंबंधी सांगितलं आहे.
आरोपी विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतो. आयआयटीचे डीन सौम्य मुखर्जींनी त्याला ‘मूड इंडिगो’ या फेस्टिव्हलमध्ये मेंटॉर म्हणून नियुक्त केलं होतं. नवीन विद्यार्थ्यांना आयआयटी बॉम्बेच्या अभ्यासक्रमबाबत तो मार्गदर्शन करणार होता.
आरोपी विद्यार्थ्याने १५ ज्युनिअर विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी गेल्या सहा-सात महिन्यात आल्या आहेत. आयआयटी बॉम्बेच्या शिस्तपालन समितीकडे या तक्रारी आल्या होत्या. परिस्थितीजन्य पुरावे आरोपी विद्यार्थ्याचं निलंबन करण्यासाठी पुरेसे नव्हते, असं व्यवस्थापनाने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला आहे. आरोपी विद्यार्थ्यावर कारवाई झाली नाही, तर पदवीदान संमारंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही काही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *