download (1)

सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई धनुषचं मराठीत पदार्पण

मनोरंजन

धनुषने आपल्या करिअरची सुरुवात गायक म्हणून केली होती. त्यानंतर तो साऊथचा सुपरस्टार झाला. रांझणा चित्रपटाच्या माध्यमातून त्यांने बॉलिवूडमध्ये सुद्धा डेब्यू केला. रांझणा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला हिट ठरला होता. साऊथ आणि बॉलिवूडनंतर धनुष आता मराठीमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
फ्लिकर या अमोल पाडवे दिग्दर्शित चित्रपट धनुषने मराठीत गाणं गायले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट म्हणजे या गाण्याला संगीत प्रसिद्ध संगीतकार इलायाराजा यांनी दिले आहे. धनुष स्वत: इलियाराजा यांचा फॅन आहे. त्यामुळे हे गाणं म्हणजे सोने पे सुहागा असेच म्हणावे लागले. मंगेश कांगणेने हे गीत रचले आहे. धनुष याला मराठीमध्ये गाणं गाताना शब्दोच्चारात अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन मंगेश कांगणे याने सोपे शब्द असलेलं गाणं तयार केलं. प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी गाणं गात असल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हे गाणं धनुष याने गायले आहे. चेन्नई काही महिन्यांपूर्वी या गाण्याचं रेकॉर्डींग करण्यात आले. सहा तासाता धनुषने हे गाणं रेकॉर्ड केल्याचे कळतेय. धनुषचे मराठी गाणं ऐकण्यासाठी त्याचे फॅन्स नक्कीच आतुर झालेले असतील.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *