cd4049a5fed96fe582c25fb054f94b9e

भाजपाच्या सत्ता सोडण्याच्या निर्णयाने अनेकांना अनपेक्षित धक्का

देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भारत काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा केल्यापासून राजकीय वर्तुळात दोन्ही पक्षांच्या यशापयशाची गणिते मांडण्याची प्रथा सुरु झाली आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या ताब्यातील राज्यांचा हिशेब नव्याने मांडला जातो. गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहता भाजपा दिवसेंदिवस या उद्दिष्टाच्या अधिकाअधिक जवळ येत असल्याचे दिसते. मात्र, मंगळवारी भाजपाने जम्मू काश्मीर सरकारमधून स्वत:हून बाहेर पडत अनेकांना अनपेक्षित धक्का दिला.

एरवी सत्तेसाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपाचा सत्ता सोडण्याचा हा निर्णय अनेकांना बुचकाळ्यात टाकणारा ठरला. त्यामुळे भाजपाच्या ताब्यातील राज्यांची संख्या एकने कमी झाली आहे. आता देशातील केवळ 18 राज्यांमध्येच भाजपाची सत्ता उरली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निवडणुकांमध्ये पराभव झाल्यास हा आकडा आणखी खाली घसरु शकतो.
काही महिन्यांपूर्वी ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये ‘कमळ’ फुललं, तेव्हा देशातील १९ राज्यांमध्ये भाजपा सत्तेत होती. त्यानंतर, मेघालयमध्येही नॅशनल पीपल्स पार्टीसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली आणि २०चा आकडा गाठला होता, पण तेलुगु देसम राओलातून बाहेर पडल्यानं आंध्र प्रदेशमधील सत्तेतून ते बाहेर गेले. नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले होते.
कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींनी काँग्रेस आता फक्त ‘पीपीपी’ पक्ष ठरेल, अशी खोचक टीका केली होती. पंजाब, पाँडेचरी आणि परिवार असा पीपीपीचा फुलफॉर्म मोदींनी सांगितला होता. परंतु कर्नाटकमध्ये काँग्रेसने राजकीय जुळवाजुळव करून सत्ता राखण्यात यश मिळवले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *