DgBxRufXUAE5R9o

धक्कादायक ! कार तलावात कोसळून सहा चिमुरड्यांचा मृत्यू

देश

बिहारमध्ये तलावात कार कोसळून सहा मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. कुर्साकाटामधील चिकनी गावात लग्न समारंभ आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांची कार डोरिया गावी निघाली होती. त्यावेळी रस्त्यावर आंबे तोडणाऱ्या लहान मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि झाडावर आपटून गाडी तलावात कोसळली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून सात जण प्रवास करत असताना ताराबाडी गावाच्या बाजूला असलेल्या तलावात कार कोसळली. यामध्ये सहा मुलांचा मृत्यू झाला असून बचाव कार्यादरम्यान एका मुलाला वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *