download (6)

शिवस्मारकाबद्दल पुन्हा एकदा चर्चा

मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यासाठी हायकोर्टाच्या एका खंडपीठाकडे त्या पाठवण्यात येतील, असे निर्देश मंगळवारी हायकोर्टाने जारी केले. याच विषयाला अनुसरुन पर्यावरणविषयक समस्या उपस्थित करुन दाखल केलेल्या याचिकाही हायकोर्टात प्रलंबित आहेत.

न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. निधीची तरतूद राज्य सराकार कशी करणार? त्याचबरोबर राज्याची आर्थिक स्थिती मजबूत नसताना भव्य असं शिवस्मारक उभारण्याचा अट्टहास का? असा सवालही याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या महत्त्वाकांक्षी घोषणेला विरोध करणारी जनहित याचिका प्राध्यापक मोहन भिडे यांनी दाखल केली आहे. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटन्ट आणि भिडे कपासी नावाजलेल्या कोचिंग क्लासमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *