Crime_68871_01265

धक्कादायक ! मुलाने दिले आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष

महाराष्ट्र

मुलाने आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष घातल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये घडला. यामध्ये ६५ वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला. तर आईची प्रकृती गंभीर आहे.
धक्कादायक म्हणजे मुलाचं महिन्याभरापूर्वीच लग्न झाल्याने, त्याचा संसार कसा सुरु आहे, हे पाहण्यासाठी आई-वडील औरंगाबादहून लातूरला आले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी नराधम मुलगा ज्ञानदीप याला अटक केली आहे. पोलिसांचा सुनेवरही संशय आहे.
लातूर शहरातील घर नावावर करुन देत नसल्यामुळे ज्ञानदीपने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. ज्ञानदीपचे वडील सेवानिवृत्त प्राचार्य होते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *