images (1)

मुंबईमध्ये तब्बल २९ हजार १४० आगीच्या दुर्घटना

मुंबई

मुंबईत गेल्या सहा वर्षात आगीच्या तब्बल २९ हजार १४० घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने ही माहिती दिली. मुंबईत २०१२ ते एप्रिल २०१८ पर्यंत एकूण २९ हजार १४० आगीच्या घटना घडल्या. यामध्ये तब्बल ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ९२५ जण आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले आहे. आग विझवताना अग्निशमन दलाचे एकूण १२० अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये मोठय़ा संख्येने टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र अनेक इमारतींमधील अग्निसुरक्षा व्यवस्था सदोष असल्याचे आगीच्या घटनांनंतर उघडकीस आले आहे. वाढत्या आगीच्या घटनांची दखल घेऊन पालिका प्रशासनाने इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांच्या तपासणीची जबाबदारी अग्निशमन दलावर सोपविली आहे. मात्र अग्निशमन दलाने सुचविलेल्या सुधारणांची अंमलबजावणी इमारतीमध्ये करण्यात आली आहे की नाही याची खातरजमा करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. आगीच्या घटना टाळता याव्या यासाठी इमारतींमधील रहिवाशांनी सावधपणे अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *