Electronic-voting-machine

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुरेश धस विजयी

महाराष्ट्र

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी तब्बल 76 मतांनी विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे.
सुरेश धस यांना 527 मतं, अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. तर तब्बल 25 मतं बाद झाली.
धस यांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का आहे, तर पंकजा मुंडे यांचा मोठा विजय आहे.
राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला होता.
त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार कोण यापेक्षा पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत असल्याचं चित्र होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *