_af120eba-6af3-11e8-8033-47bccc77d658

ज्याच्या आगमनाची प्रतिक्षा करत आहेत तो नैऋत्य मोसमी मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळ कोकणात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाल्याचे शुक्रवारी सकाळी भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. मागच्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्याने तापमानात घट झाली असली तरी उकाडायापासून दिलासा मिळालेला नाही.
मुंबईकर अजूनही काही पावल चालल्यानंतर घामाच्या धारांनी भिजून निघत आहेत. त्यामुळे सर्वचजण चातकासारखी मान्सूनच्या पावासची वाट पाहत आहेत. मान्सूनने आता दक्षिण कोकणचा पट्टा व्यापला असून उद्यापर्यंत म्हणजे शनिवारी मान्सून मुंबईत धडकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या आठवडा अखेरीस कोकण आणि मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आधीच हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *