Maharashtra-Board-SSC-Result-2019

दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. उद्या (8 जून) ऑनलाइन पद्धतीनं दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाइटवर निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं हा निकाल पाहता येणार आहे. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

या वेबसाइटवर पाहता येणार निकाल

www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.rediff.com/exams

कसा पाहाल निकाल?

दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सायली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SAY असं लिहावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *