mumbai-3

मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात

मुंबई

विजांच्या कडकडाटांसह मुंबईत आज पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाच्या सरी बरसत आहेत.अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसरमध्ये पाऊस पडत आहे. यासोबतच कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर आणि मुलुंडमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. चर्चगेट आणि सीएसटीला पहाटे विजांच्या कडकडाटात जोरात पाऊस सुरु झाला होता.
सोमवारी मुंबईत जोरदार पाऊस पडल्यानंतर पाऊस गायब झाला होता. दोन दिवस मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. आज पडत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळेल. दरम्यान ८ ते १० जून दरम्यान मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आठवड्याच्या शेवटी म्हणजेच ८ ते १० जून दरम्यान मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आल्यावर रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती पाहता नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *